नंदीबैल घेऊन फिरणार्‍यांनी भीती दाखवून अनेकांकडून उकळले पैसे

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ’तुला १० दिवसांत अर्धांगवायूचा झटका येईल, तुझ्या जीवाला मोठा धोका आहे,’ असे सांगत एका महिलेच्या मनात भिती घालून पूजेच्या नावाखाली पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना १२ फेब्रुवारीला एन ६, सिडको भागात घडली.
सिडको भागात नंदीबैल घेऊन ५ ते ६ जण परिसरात दाखल झाले. ओंकार नावाच्या तरुणाच्या घराजवळ येत तांदूळ देताना पोळी-भाजी मागण्याच्या बहाण्याने एक जण घरात शिरला. बाहेर वडील व लहान मुलाशी गप्पा मारत टोळीने घरातील माहिती हळूच गोळा केली. बाहेर चाललेल्या संवादाचा आवाज आत ऐकू येत असल्याने, घरातील महिलेशी बोलणार्‍या भामट्याने हीच माहिती तिला सांगत, महिलेला गंभीर आजार आणि मृत्यूची भीती दाखवून, संकट टाळण्यासाठी मोठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. सुरुवातीला तब्बल ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या महिलेकडून अखेर ३ हजार ५०० रुपये उकळून टोळी निसटली.